21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून एक पाऊल निरोगी जीवनशैलीकडे टाकूया. देश सुदृढ बनवूया.

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. या उपक्रमाने आता चळवळीचे रूप घेतले आहे.शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात, याचेच अवचित्य साधुन योगाभ्यास करण्याकरिता मार्गदर्शक व्हिडियो पहा.

सूर्यनमस्कार ( SuryaNamskar )

https://youtu.be/6hmWj68byJ0

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.

अर्धचक्रासन ( Ardha Chakrasana)

तुम्हाला मधुमेह अथवा साखरेचा कोणताही आजार वा पोटावरील चरबीपासून सुटका हवी असेल तर अर्धचक्रासन हा उत्कृष्ट पर्याय आहे. याबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तींना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन अजिबात करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहावं. केवळ मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

भुजंगासन ( Bhujangasana )

हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. ‘भुजंग’ म्हणजे सर्प. भुजंग ह्या शब्दाने क्वचित नागाचाही बोध होतो. या आसनात शरीराची रचना फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला भुजंगासन हे नाव प्राप्त झाले आहे. सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता.

पादहस्तासन ( Padahastasana )

पद’ म्हणजे पावले, किंवा पाय आणि ‘हस्त’ म्हणजे हात, त्यामुळे शरीराच्या या दोन्ही भागांचा उपयोग करून ‘पादहस्तासन’ केले जाते. हे आसन करताना ताठ उभे राहून सावकाशीने श्वास सोडत पुढील बाजूला कंबरेतून झुकत दोन्ही हातांचे पंजे पायाच्या तळव्यांच्या शेजारी टेकविले जातात. ज्यांना या आसनाचा सराव नसतो, त्यांना सुरुवातीला पुढे झुकून हाताचे पंजे जमिनीवर टेकविणे सहज जमत नाही. पण जसजसा सराव वाढत जातो, तसे हे आसन सहजसाध्य होऊ लागते. हे आसन पायांच्या स्नायूंना (hamstrings) बळकटी देणारे आहे. पाठीच्या स्नायूंना आवश्यक व्यायाम देणारे आणि पोटावरील चरबी कमी करण्यास सहायक असे हे आसन आहे. पचनासंबंधी तक्रारी असल्यास त्या कमी करण्यासाठी हे आसन सहायक आहे. मुलांच्या वाढीव वयामध्ये उंची चांगली वाढावी यासाठी देखील हे आसन अतिशय महत्वपूर्ण आहे. या आसानामध्ये पुढच्या बाजूला पायाच्या दिशेने झुकले असता मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्याच्या दृष्टीनेही हे आसन अतिशय उपयुक्त आहे. पादहस्तासन करण्यापूर्वी काही आसने केली गेल्यास पादहस्तासन अधिक सहज केले जाऊ शकते. यासाठी हे आसन करण्यापूर्वी सूर्यनमस्कार, उत्तानासन, पश्चिमोत्तानासन इत्यादी आसनांचा सराव केल्याने पादहस्तासन अधिक सहज करता येऊ शकते.

ताडासन ( Tadasana )

ताडासन हे दोन संस्कृत शब्द ताडा आणि आसन यांनी बनलेले आहे. येथे ताडा म्हणजे माउंटन आणि आसन म्हणजे पोझेस. पाय आणि शरीर दोन्ही ताणण्यासाठी आणि लांबी वाढविण्यासाठी ताडासन योग मुद्रा अतिशय प्रभावी आहे. याशिवाय हे आसन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे आपल्याला विविध विकारांपासून दूर ठेवते आणि शरीराच्या समस्या दूर करते. आज या लेखात आम्ही आपल्याला ताडासन कसे करावे हे दर्शवेल, ताडासन योग करणे, ताडासानाचे फायदे , ताडासन करताना खबरदारी सांगेल.

शलभासन ( Shalabhasan )

शारीरिक आकृतिबंध जमिनीवर बसलेल्या टोळाप्रमाणे (शलभ) वाटतो. वर उचललेले पाय टोळाच्या शेपटीसारख्या मागील भागाप्रमाणे वाटतात म्हणून यास ‘शलभासन’ असे म्हणतात. पोटावर झोपून केल्या जाणाऱ्या आसनांमध्ये या आसनाचा समावेश होतो. कंबरदुखीच्या सर्व प्रकारांत आणि आजारांत शलभासन करणे फायद्याचे ठरते. हे आजार दूर होण्यास या आसनाने मदत होते.

उष्ट्रासन ( Ustrasana )

या आसनस्थितीत शरीराची अवस्था उंटाच्या आकाराची होते, म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. या आसनामुळे गुडघे, ब्लडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. श्वास, पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होण्यास मदत होते.

त्रिकोणासन ( Trikonasna )

या आसनामध्ये शरीराचा आकार त्रिकोणी होतो, म्हणून त्यास त्रिकोणासन म्हणतात. कंबरेचे दुखणे असणाऱ्यांसाठी आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे आसन महत्त्वाचे आहे. या आसनामुळे कंबरेचे स्नायू लवचीक व मजबूत बनतात. या आसनामुळे पचनक्रियाही सुधारते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि शरीर सुडौल करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.

वज्रासन ( Vajrasana )

‘वज्रासन’ या शब्दाची फोड केली तर ‘वज्र + आसन’ असा होतो. वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र शिवाय याचा अर्थ जननेंद्रीय असाही केला जातो. या आसनाचा परिणाम ओटीपोटावर व जननेंद्रीयावर होतो म्हणून हे आसन फार फायद्याचे असते. ध्यानधारणा करण्यासाठीही या आसनाचा उपयोग केला जातो. या आसनाची पकड इतकी मजबूत असते की, त्यावरुनच या आसनाचे नाव असे ठेवण्यात आले आहे. वज्रासन करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. अगदी कधीही हे आसन तुम्हाला करता येऊ शकते. पचनशक्ती, वजन कमी करण्यासाठी, लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी हे आसन फारच फायद्याचे असते.

भद्रासन ( Bhadrasana )

भद्रासन केल्याने कंबरदुखी, डोकेदुखी, निद्रानाश, दमा, उलटी, अतिसार यांसारख्या अनेक आजारांपासून मुक्तता मिळू शकते. भद्रासनामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मनाची एकाग्रता होण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. यामुळे मनाची चंचलता नाहीशी होते. यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. पायांचे सर्व सांधे मोकळे होण्यास मदत होते.

वक्रासन ( Vakrasana )

या आसनात शरीराचा वरील भाग हा पूर्णपणे वक्र होतो म्हणून या आसनास वक्रासन असं म्हणतात. असं केल्याने पाठीचा कणा, हात, पाय, तसंच पाठीच्या स्नायूंना चांगलाच ताण मिळतो. वक्रासन फुफ्फुसाची क्षमता वाढवते. त्यामुळे अधिकाधिक ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. यामुळे मणक्यातील,मांड्यातील तसेच पोटावरील स्नायूंवर ताण येऊन वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे पचनशक्ती सुधारते, अन्न अधिक चांगल्याप्रकारे पचते व वजन घटण्यास मदत होते.

शशांकासन ( Shashankasana )

संस्कृतमध्ये शशांक याचा अर्थ ‘चंद्र’ आहे. या शब्दांचे दोन अर्थ आहेत. दुसरे म्हणजे ‘ससा.’ हे आसन करताना त्याचा आकार सशासारखा दिसतो. तसेच चंद्र हा शीतल व शांत आहे. हे आसन करताना आपण पूर्णपणे रिलॅक्स होतो. जे चंद्राचे गुण आहेत तेच हे आसन करताना आपणास अनुभवयास येते. हे आसन ताण-तणाव दूर करण्यास तसेच रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पाठदुखी कमी होते तसंच पोटावरची चरबी कमी होण्यासही मदत होते.

पवन मुक्तासन ( Pawan Muktasana )

या आसनामुळे पोयाचे विकार कमी होण्यास मदत मिळते, पचनाच्या विकारात हे आसन फायदेशीर आहे. हृदय रोग असो किंवा स्त्रियांच्या पोटाचे विकार या आसनाने तुम्हाला फायदा मिळेल. चुकीच्या जीवनशैलीमुळे पोटात गॅस, अ‍ॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या अनेकांना सतावते. वेळी, अवेळी खाणे, झोपेचा अभाव, जागरण आदी कारणांमुळे हा त्रास जास्त होतो. यावर पवन मुक्तासन हा खुप चांगला उपाय आहे. परंतु, गुडघेदुखी, कंबरदुखी तसेच गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये.

सेतुबंधासन ( Setu Bandhasana )

‘सेतू ‘ म्हणजे पूल. या आसनात शरीराचा आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास ‘सेतुबंधासन’ (setu bandhasana) असे म्हणतात. हे एक उपयुक्त आसन असल्यामुळे सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी ते करण्याचा प्रयत्न करावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊन फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व तसेच उच्च रक्तदाब, दमा, ऑस्टिओपोरोसिस, सायनस या सारखे आजार दूर करते. या आसनाचा सराव आपल्याला तणाव मुक्त करू शकते. जर तुमची नेहमीच चीड चीड होत असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ताण येत असेल तर या आसनाच्या सरावामुळे तुमचे मन शांत होऊन तुमचा ताण कमी होण्यास मदत होते. येथे आपण सेतुबंधासनाची कृती आणि फायद्याबद्दल(Bridge Pose & its Benefits) मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात.

नाडी शोधन प्राणायाम / अनुलोम विलोम प्राणायाम

अनुलोम आणि विलोमचा Anulom Vilom Pranayam in Marathi अर्थ आहे की अनुलोम म्हणजे सरळ आणि विलोम म्हणजे उलटे होय. यालाच आपण अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रीथिंग सुद्धा म्हणू शकतो. अनुलोम विलोम प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम आहे. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये आपण नाकाच्या एका छिद्रातून श्वास आत मध्ये घेतला जातो, आणि दुसऱ्या छिद्रातून श्वासबाहेर सोडल्या जातो. यामध्ये नाडी साफ करण्यासाठी हा अनुलोम विलोम प्राणायाम केला जातो. प्राचीन काळातील ऋषी मुनींनी सुद्धा स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी या अनुलोम विलोम प्राणायाम केला आहे. या प्राणायामच अभ्यास ऋषींनी केला आहे. इंग्रजी मध्ये याला पल्स म्हणतात. या अनुलोम विलोम प्राणायाम मेंदूमध्ये प्राणवायू ऑक्सिजनची पातळी वाढवतो. यामुळे आपले फुप्फुसे बळकट बनतात. अनुलोम विलोम प्राणायाम करताना ३ प्रक्रिया अवश्य करयाला पाहिजेत. अनुलोम विलोम प्राणायाम आपल्या वृद्धावस्था मध्ये पायांच्या दुखापासून सुटकारा मिळतो. गुडघे दुखण्यापासून आराम मिळतो. नियमित अभ्यास केल्यामुळे नाडी शोधन व्यवस्थित होते, आणि स्वच्छ व निरोगी बनते.

वृक्षासन ( Vrikshasana )

हे आसन करण्यास अत्यंत सोपे असून या आसनात शरीराचा आकार वृक्षाप्रमाणे म्हणजेच झाडाप्रमाणे दिसत असल्यामुळे या आसनाला वृक्षासन(Vrikshasana) असे म्हणतात. या आसनालाच इंग्रजी मध्ये ट्री पोझ (tree pose) असे म्हणातात. या असणामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा भार एका पायावर तोलल्या जातो तसेच हे आसन करताना आपले संपूर्ण शरीर ताणले जाते व आपल्या हातापायांच्या साध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. स्ट्रेचिंग करण्यासाठी वृक्षासन हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. या आसनामुळे आपले हात, पाय, मांड्या व कंबर यांचा भरपूर व्यायाम होतो. हे आसन एकाग्रता वाढविण्यासाठी खूप मदतगार आहे. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा लागतो, असे करताना डोक्यातील इतर विचार आपोआपच बाजूला सारल्या जातात त्यामुळे मानसिक स्थैर्य साधल्या जाते. याचाच उपयोग स्मरणशक्ती वाढण्या साठी होतो. चला तर मग वृक्षासनाची कृती व त्यापासून मिळणाऱ्या संपूर्ण फायद्याबद्दल मराठी मध्ये जाणून घेऊ.

ध्यान (Dhyan)कसे करावे? मेडिटेशन कसे करावे?

ध्यान केल्याने आपल्याला मन:शांती, आनंद, आरोग्य यांचे लाभ होऊन परिपूर्ण, तणाव मुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. आपल्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य लाभ आहेत. तसेच ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. शरीराला आराम जितका जास्त गहन, शरीराचे म्हणा किंवा मनाने आपले काम तितकेच जास्त गतिशील.

आंतरजालावरुन साभार

सूर्यनमस्कार

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही तथाकथित सूर्य-उपासनाच आहे. हिच्यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच पण आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणीआहे असे म्हणतात.

सूर्यनमस्कारात बारा आसन पवित्र्यांचा समावेश आहे. ते बारा पवित्रे असे आहेत:

  1. प्रणामासन किंवा नमस्कारासन,
  2. हस्त उत्तासन,
  3. पादहस्तासन,
  4. अश्‍वसंचालनासन,
  5. पर्वतासन,
  6. अष्टांग नमस्कार,
  7. भुजंगासन,
  8. पर्वतासन,
  9. अश्‍वसंचालनासन,
  10. पादहस्तासन,
  11. हस्त उत्तासन,
  12. प्रणामासन

हे नमस्कार घालताना, प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे ‘ओम मित्राय नमः’ आणि मग वरील बारा पवित्रे घ्यायचे. एक नमस्कार पूर्ण झाल्यावर सूर्याचे दुसरे नाव घेऊन दुसरा सूर्यनमस्कार अशी बारा नावे घेऊन बारा नमस्कार घालायचे.
ही बारा नावे अशी आहेत:

  1. ओम मित्राय नमः
  2. ओम सूर्याय नमः
  3. ओम खगाय नमः
  4. ओम हिरण्यगर्भाय नमः
  5. ओम आदित्याय नमः
  6. ओम अकार्य नमः
  7. ओम रवये नमः
  8. ओम भानवे नमः
  9. ओम पूष्णय नमः
  10. ओम मरिचये नमः
  11. ओम सवित्रे नमः
  12. ओम भास्कराय नमः

भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी (शुक्ल सप्तमी); या रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

साष्टांग नमस्कार श्लोक –

उरसा शिरसा द्रष्ट्या वचसा मनसा तथा।पदाभ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामः अष्टांग उच्यते॥

अर्थ – दृष्टी, मन आणि वाणी संयमीत करुन (एक) छाती, (एक) मस्तक, (दोन) पाय, (दोन) हात, (दोन) गुडघे, या आठांनी जो नमस्कार करायचा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात.

हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे.

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्ऱ्यं नोपजायते ।।

जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्ऱ्य येत नाही (काहीही कमी पडत नाही)

सूर्य नमस्कार हा सर्वागीण व्यायाम आहे. सर्व यौगिक अभ्यासासाठी सूर्योदयाची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. त्याचप्रमाणे सूर्य नमस्कारसुद्धा सूर्योदयाच्या समयी घालणे हितकारक आहे. उघड्यावर हवेशीर जागेवर रिकाम्या पोटी सूर्य नमस्कार घालावेत. मन शांत आणि प्रसन्न असल्यावर सर्व योगाभ्यासाचा आपणावर विशेष परिणाम होतो, असे म्हणतात.

सूर्यनमस्कारांतील आसने[संपादन]

आसनश्वासक्रियाचित्रमाहिती
प्रणामासनउच्छ्वाससरळ उभे रहा. उजव्या पायाचा अगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जमिनीला काटकोनात. अंगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभगी. कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत ह्याची काळजी ह्या थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
हस्त उत्तानासनश्वाससरळ उभे रहा. उजव्या पायाचा अगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जमिनीला काटकोनात. अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी. कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत ह्याची काळजी ह्या थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
उत्तानासनउच्छवाससरळ उभे रहाण्याच्या स्थितीतून सावकाश कमरेतून खाली वाका. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुढघा किंवा टाचेवर ताण येणार नाही याकडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न करा.
अश्व संचालनासनश्वासउजवा पाय आणि दोन्ही हात घट्ट जिमनीवर रोवा. डावापाय मागे घ्या डाव्यापायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा. डाव्यापायाचा गुढघा जमिनीवर टेकवा. उजवा पाय गुढघ्यात वाकवा. उजव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा). दोन्ही हात सरळ ठेवा. त्याना खांद्यातून वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.
चतुरंग दंडासनउच्छवासहाता-पायाची जागा तीच ठेवा. शरीराचे वजन खांदे आणि हात यावर घ्या. खांदे वर उचला.उजवा पाय डाव्या पायाजवळ मागे घ्या.पायाला पाय घोट्याला घोटा गुढघ्याला गुढघा जुळवा. पावलाच्या दिशेला, घोट्याचा आधार घेऊन, ताण द्या. डोक्यापासून पायापर्यंत शरीर तिरक्या स्थितीमध्ये ठेवा. नजर जमिनीवर काटकोनात स्थिर ठेवा
अष्टांग नमस्काररोखाहाताचे पंजे व पायाचे चवडे यांची स्थिती आहे तशीच ठेवा. गुढघे जिमनीवर टेकवा. शरीराचे वजन हातावर घ्या. कोपरामध्ये वाका. हनुवटी छातीला टेकवा. साष्टांगनमस्कारासन स्थिती मध्ये कपाळ, छाती, हात, गुढघे पाय जमिनीवर टेकवा. दोन्ही कोपरे शरीराजवळ घ्या नाभिकेंद्र व पार्श्वभाग वर उचलून धरा.
भुजंगासनश्वासहाताचे पंजे आहे त्या ठिकाणीच ठेवा. पंजावर शरीराचा भार द्या. कोपरामधील वाक काढा. हात सरळ करा. खांदे वर उचला. डोके आणि खांदे मागे खेचा. पोट व कंबर दोन्ही हाताच्या मध्ये सरकिवण्यांचा प्रयत्न करा. घोटे गुढघे बांधलेले तसेच ठेवा. गुढघे जमिनीला टेकवा. छातीमध्ये हवा भरून घ्या. नजर वर आकाशाकडे लावा.
अधोमुख श्वानासनउच्छवासहाताचे पंजे व पायाचे चवडे यांची जागा तीच ठेवा. शरीराचा मधला भाग वर उचला. कंबर हात पाय यांचा त्रिकोण तयार करा. तो वर उचलून धरा. चवडे व टाच पूणर्पणे जिमनीवर टेकवा. हात आणि पाय सरळ ठेवा. कोपर गुढघे सरळ ताणलेल्या स्थितीमध्ये ठेवा. डोके पाठीच्या रेषेमध्ये ठेवा. हनुवटी छातीला टेकवा
अश्व संचालनासनश्वासदोन्ही हातांच्या पंजांची जागा तीच ठेवा. डावा पाय डाव्या हाताजवळ आणा. डावा पाय आणि दोन्ही हात जमिनीवर रोवा. डाव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा.) उजवा पाय मागे घ्या. उजव्या पायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा. उजव्या पायाचा गुढघा आणि डाव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकवा. दोन्ही हात सरळ ठेवा. त्यांना वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.
१०उत्तानासनउच्छवासउजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. सावकाश गुढघे सरळ करा. पार्श्वभाग वर उचला. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुढघाकिंवा टाचेवर ताण येणार नाही कडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुढघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा
११हस्त उत्तानासनश्वाससरळ उभे रहा. उजव्या पायाचा अगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जमिनीला काटकोनात. अगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभागी. कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत ह्याची काळजी ह्या थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
१२प्रणामासनउच्छवाससरळ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीमध्ये. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. एकमेकांवर पक्के दाबून धरा. अंगुष्टमुल कपाळावर मध्यभागी. पंजे एकमेकांना पक्के चिकटलेले. सूर्यबिंबाकडे बघण्यांसाठी मान वर उचललेली. डोके मागे ढकलण्य्याचा जास्तीतजास्त प्रयत्न. कोपर खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवण्यांचा जास्तीतजास्त प्रयत्न

https://marathidoctor.com/surya-namaskar-in-marathi.html

मंत्र

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे, असे म्हणतात.

क्र.मंत्रचक्र
ॐ मित्राय नमःअनाहत चक्र
2ॐ रवये नमःविशुद्धी चक्र
ॐ सूर्याय नमःस्वाधिष्ठान चक्र
ॐ भानवे नमःआज्ञा चक्र
ॐ खगाय नमःविशुद्धी चक्र
ॐ पूष्णे नमःमणिपूर चक्र
ॐ हिरण्यगर्भाय नमःस्वाधिष्ठान चक्र
ॐ मरीचये नमःविशुद्धी चक्र
ॐ आदित्याय नमःआज्ञा चक्र
१०ॐ सवित्रे नमःस्वाधिष्ठान चक्र
११ॐ अर्काय नमःविशुद्धी चक्र
१२ॐ भास्कराय नमःअनाहत चक्र
१३ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः

सूर्यनामांचा क्रम (सिक्वेन्स) लक्षात ठेवण्यासाठी खालिल श्लोकाचा काही जण उपयोग करतात
|| मित्र रवि सूर्य भानू खग पूष्ण हिरण्यगर्भ| आदित्य च मरिच सवित्रे अर्क भास्कर नमो नमः||

मित्र= जगन्मित्र , रवी= सर्वाना पूजनीय, सूर्य-प्रवर्तक,संचालक, भानू=तेज देणारा, खग= अकाशातून हिंडणारा, पूषा-पोषण करणारा, हिरण्यगर्भ=पोटात तेज असणारा, मरीच=रोगनाशक, आदित्य= सर्वाकर्षक, सविता= सर्व उत्पादक, अर्क= आदरणीय, भास्कर= प्रकाशमान असे याचे अर्थ आहेत.

सूर्यनमस्कार व शरीरसौष्ठव

सूर्यनमस्कार व श्वासोच्छवास

सूर्यनमस्कारांत वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. साष्टांग नमस्कार हे सूर्यनमस्कारातील एक आसन पुरातनकाळापासून सूर्याला प्रणाम करण्याकरिता वापरले गेले आहे. धेरंड संहितेमध्ये भुजंगासन हे ३२ महत्त्वाच्या आसनांमध्ये गणले गेले आहे. अधोमुक्त श्वानासनाचे वर्णन मल्लपुराणात केले गेले आहे.

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व हाडांचे काही दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहीसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.  

शिवाजी महाराज व समर्थ रामदास सूर्यनमस्कारांचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.

तृचाकल्प नमस्कार

तृचाकल्प नमस्कार ही सूर्य नमस्काराची एक पद्धती आहे. एक भांडे घेऊन त्यात गंध, अक्षता आणि फुले घालतात .ते समोर ठेवून त्यावर सूर्याचे  ध्यान करतात.त्यानंतर बीजमंत्र जोडून सूर्याची  बारा नावे म्हणतात.  उदा.ॐ ह्रां सूर्याय नम: | याप्रमाणे. व नमस्कार घालतात. असे एकूण २२ नमस्कार घातले जातात . नंतर सूर्याची प्रार्थना करून भांड्यातील पाणी तीर्थ म्हणून घेतात.

आंतरजालावरुन साभार

बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमा

भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर करणारे आजही शांततेचा मार्ग निवडतात. बौद्ध धर्मीयांसाठी वैशाख पौर्णिमेचा (Vaishakh Purnima) दिवस हा खास असतो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बौद्ध यांचा जन्म आणि निर्वाण दोन्ही वैशाख पौर्णिमेदिवशीच झालं असल्याने या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. यंदा बुद्ध जयंती (Buddha Jayanti) हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, बौद्ध पौर्णिमा 26 मे दिवशी आहे. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण देणारे गौतम बुद्ध (Gautam Buddha) आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांची शिकवण आज जगाला कठीण काळातही सामना करण्यासाठी बळ देते. मग यंदा बुद्ध पौर्णिमेदिवशी गौतम बुद्ध यांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध जयंती आणि बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छा शेअर करून त्यांच्या विचारांना आजच्या दिवशी पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू या! 

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधीवृक्ष’म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते.

भारताप्रमाणेच बौद्ध धर्माची शिकवण आणि संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया या देशांमध्ये पाळली जाते. गौतम बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सामान्यांपर्यंत पोहचवले. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्यं, अष्टांग मार्ग व पंचशीले जगाला दिली आहेत.

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले ,दुःख नाहीसे करून सुख शांती आणि,समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा.  बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही बुद्ध मानव आहे, देवता नाही बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही बुद्ध विचार आहे, दुराचार नाही बुद्ध शांती आहे, हिंसा नाही बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेची आज आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करेल आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या मार्गाकडे घेऊन जावो! तुम्हाला बुद्ध जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

बुद्धं शरणं गच्छामि , धम्मं शरणं गच्छामि , संघं शरणं गच्छामि . बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्यांना प्रकाश देऊ शकते तसाच, बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्वल करू शकतो, धम्मप्रसारक महान भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा

तुमचा शत्रु जितकी इजा पोहोचवीत नाही , तितकी नकारात्मक विचार देतात. म्हणून नेहमी सकारात्मक रहा. बुद्ध पूर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा नमो बुद्धाय.

बुद्ध विचार आहे, दुराचार नाही . बुद्ध शांती आहे, हिंसा नाही. बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही .बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही. बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर ज्ञान देतील. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास बुद्ध पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान बुद्ध आपल्या जीवनातील सर्व पाप आणि अडथळे नष्ट करु आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात.  बुद्ध पौर्णिमेच्या या शुभदिनी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

भगवान बुद्ध प्रेम, शांती आणि सत्याच्या मार्गावर आपले मार्गदर्शन करतात. आपण आणि आपल्या परिवारास  बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश , महालसुख सोडूनी घातला भिक्षुकाचा वेश , नाकारले राजपुत्र ,असे होते तथागत गौतम बुद्ध , बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त गौतम बुद्धांच्या स्मृतीस त्रिवार वंदन

पुण्यातील देवालयांची गंमतीशीर नावे | पुण्यातील मंदीरांची हटके नावे | Unique names of temple in Pune

नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!

‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण पुणेकर सर्वार्थाने सार्थ करत असतात. काहीतरी आगळंवेगळं, आकर्षक आणि काहीसं विचित्र अशा अनेक गोष्टी पुण्यात पाहायला मिळतात. गोष्टीच कशाला, विचित्र व्यक्तींचीसुद्धा पुण्यात काही कमतरता नाही. कितीही चर्चेचा विषय होत असला तरीसुद्धा पुणेकरांनी आपले निराळेपण अगदी आजच्या काळातसुद्धा जपून ठेवले आहे. जशा पुणेरी पाटय़ा हा एक मोठा चर्चेचा विषय आहे तशीच पुण्यातल्या देवांना असलेली नावे हासुद्धा तितकाच मजेशीर विषय आहे.

कुठलीही व्यक्ती, संस्था, देवालये ही एका विशिष्ट नावाने ओळखली जाते, पण पुण्यात मात्र देवांना जी काही नावे ठेवलेली आहेत ती बघितली की, आपण थक्क होऊन जातो.

विविध प्रांतांतून लोक येऊन पुण्यात वस्ती करू लागले. पुणे ही एक व्यापाराची मोठी पेठ तयार होत गेली आणि पुण्यात वेगवेगळ्या देवांची मंदिरे आणि देवस्थाने उभी राहू लागली. त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पुण्यात सर्वात जास्त देवळे ही मारुतीची असावीत. त्या खालोखाल शंकर, गणपती, विष्णू, देवी आणि इतर देवतांची मंदिरे दिसतात.

मागील भागात आपण मारुती मंदिराच्या हटके व गमतीशीर नावांची ओळख करून घेतली आजच्या भागात आपण इतर देवांच्या नावांची ओळख करून घेऊया.

एक आहे ‘दाढीवाला दत्त’! खरे तर दत्ताचा आणि दाढीचा इथे काहीच संबंध नाही. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी १९११ मध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेने एक दत्तमंदिर बांधले. त्याचे मूळ नाव श्रीपाद मंदिर, पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती. त्यामुळे पुणेकरांनी या दत्ताचे नामकरण केले दाढीवाला दत्त.

विजय टॉकीजजवळ आहे ‘सोटय़ा म्हसोबा’. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. या देवाला नवस बोलत असत आणि तो पूर्ण झाला की, त्याला लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल. या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत.

अजून एक वेगळे नाव असलेले मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. इथे मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे. जवळ जवळ तीन पिढय़ांच्या उपासाच्या व्रतामुळे या देवाला हे नाव पडले आहे. पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठय़ा विठोबा’ असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांना सुपूर्त केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगिकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगिकारले. तीन पिढय़ांनी अंगिकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्धीस पावला.

असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे ‘निवडुंग्या विठोबा’. नाना पेठेत असलेले मंदिर. वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली. पुढे गोसावींनी इथे मंदिर बांधले आणि तो झाला ‘निवडुंग्या विठोबा’.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे ‘पालखी विठोबा’.

तद्वत पासोडय़ांचा बाजार जिथे भरायचा, तिथे आधी मंदिर झाले पासोडय़ा मारुतीचे आणि त्याच्या नंतर त्याच्या जवळ मंदिर झाले ते ‘पासोडय़ा विठोबाचे’.

याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा’.

नागाचे स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला ‘दगडी नागोबा’.

यांच्यात भर घालायला आलेली देवळे म्हणजे ‘गुडघेमोडी माता’, ‘भाजीराम मंदिर’, मातीपासून केलेला ‘माती गणपती’, ‘गुपचूप गणपती’, पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ‘गुंडाचा गणपती’.

अजून दोन नावे अशीच आगळीवेगळी आहेत.

एक आहे ‘बीजवर विष्णू’. खरे तर विष्णूचे एकच लग्न झालेले आहे ते लक्ष्मीशी. मग पुण्यात बीजवर विष्णू कसा काय आला? तर झाले असे की, विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तींपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली. तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून वसवली म्हणून हा देव झाला बीजवर विष्णू !

आणखी एक देवस्थान म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’. सन १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधले आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली. त्यात ६० लोक मारले गेले. दुसरे असे की, चापेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱयाचा खून केला. त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे. फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथेच खून करण्यात आला. त्यामुळे हा मुरलीधर झाला ‘खुन्या मुरलीधर’.

मोदीबागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत . ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळे भटांच्या गणपतीची भक्त होती. या मासेबाजाराचा कलकलाट म्हणा, किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा या गणपतीचे नाव बोंबल्या गणपती पडले. आजही पेठेत राहणारे जख्ख आजोबा या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनच ओळखतात. पुढे कालांतराने हा मच्छी बाजार बंद झाला. देवाला असली विचित्र नावे ठेवणारी पिढीही कमी झाली पण मोदी बाग अजूनही तशीच होती. याच बागेमुळे भटांच्या बोंबल्या गणपतीचे नामकरण मोदी गणपती असे झाले.

अशी अजूनही अनेक नावे आणि देवळे पुण्यात पाहायला मिळतील. नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. तीन सोंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथपर्यंत ठीक आहे, पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!

आंतरजालावरून तसेच आशुतोष बापट यांचा सामना वर्तमानपत्रातील लेख साभार

पुण्यातील देवालयांची गंमतीशीर नावे | पुण्यातील मारुतीची हटके नावे | Unique names of Maruti in Pune

पुण्यामध्ये असंख्य देवालये आहेत्.त्याचा आकार एखाद्या खोक्यापासून तर विशाल मंदिरांपर्यन्त आहे.इतरत्र न आढळणारी गोष्ट म्हणजे इथल्या देवळांची विचित्र, गमतीशीर नावे.कधी कधी तर ती अगदी टिंगलवजाही भासतात.पुणेरी तिरकसपणाने देवांची सुद्धा गय केलेली नाही. हल्ली जर एखादे नव्याने असे नाव दिले तर मोठ्याच वादाचे प्रसंग उद्भवतील. पूर्वी बहुसंख्य देवळे ही पत्ते ओळखण्यासाठी लॅन्डमार्क म्हणून वापरली जायची. मात्र हल्ली या देवळांच्या आसपास इतर मोठाल्या स्ट्रक्चर्स जसे थिअ‍ॅटर्स, मॉल्स, हॉटेले झालीत त्यामुळे ह्या देवळांचे लॅन्डमार्क्स मागे पडत चाललेत व त्यामुळे नव्या पिढीच्या विस्मरणातूनही ही देवळे चाललीत.

त्यांची ओळख करून घेताना, त्यांची नावे समजून घेताना मोठी मौज वाटते. पुण्यात सर्वात जास्त देवळे ही मारुतीची असावीत. त्या खालोखाल शंकर, गणपती, विष्णू, देवी आणि इतर देवतांची मंदिरे दिसतात.

अशा देवळांची चर्चा घडवून आणणे हा विचार या लेखामागे आहे. यात देवळाचे नाव, त्याचे स्थळ व त्याच्या नावाचा माहीत असल्यास इतिहास अपेक्षित आहे. अशी काही माहीती असल्यास कमेंटमध्ये जरूर नोंद करा……

आजच्या लेखात आपण पुण्यातील काही मारुती मंदिराची हटके नावांचीओळख करून घेऊ.

शनिवारवाडय़ासमोरच्या पटांगणात बटाटय़ाचा बाजार भरत असे. त्यामुळे तिथे असलेला मारुती झाला ‘बटाटय़ा मारुती’. तसेच सराफांची दुकाने असलेल्या ठिकाणचा झाला ‘सोन्या मारुती’. आजच्या केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे उंटांचा तळ असायचा. त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाडय़ा मारुती’, तर स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथे थांबायची, त्या ठिकाणचा मारुती झाला ‘विसावा मारुती’. ‘डुल्या मारुतीची’ कथा काही औरच! पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता. तो झाला ‘डुल्या मारुती’. याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. दुसऱया बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलवून त्याला मान्यता दिली. म्हणून हा झाला डुल्या मारुती ! भिकारदास शेठजींच्या जागेत आला म्हणून ‘भिकारदास मारुती’, तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून ‘रडय़ा मारुती’ आणि याचसोबत सुरू होते चमत्कारिक नावांची परंपरा. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा ‘लेंडय़ा मारुती’, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, हलवायांची दुकाने असलेला भाग आणि त्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’, तल्लीन मारुती, झेंडय़ा मारुती, पत्र्या मारुती. आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’. दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावांनी प्रसिद्ध आहेत.

पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. ‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!

आंतरजालावरून साभार

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती व आख्यायिक जाणून घ्या!

नवरात्रोत्सव आला की, राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांकडे भाविकांचे पावले वळायला लागतात. राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत.

या सर्वच तिर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. मात्र, नवरात्रोत्सवात इथे जास्त गर्दी बघायला मिळते. या साडेतीन पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्द्लच्या आख्यायिका काय आहेत याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

शक्तिपीठांची दंतकथा

        आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंदसुर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचे दिव्यांवर परिधान करणारी, नवजीवनाचे आश्वासन देणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी दु:खी मानवाला आपल्या कुशीत घेणारी, प्रसंगी वात्सल्यसिंधू तर कधी रणचंडीचे उग्र रूप धारण करणारी ही अदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते.

        अदिशक्तीची काश्मीर, कांची, कामाख्या अशी तीन पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंदे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंदांचा ज्यात समावेश केला जातो अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी नावाच्या गंथात एक कथा आहे. प्रजापती दक्षाने एक यज्ञ आरंभला. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवऋषींना आमंत्रित केले, परंतु आपला जावई भगवान शंकराला बोलावले नाही. तरीही सती आपल्या वडीलांनी सुरू केलेल्या यज्ञासाठी गेली. दक्षाने तिच्या देखत शंकराची निंदा केली. त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात उडी घेतली. हे समजताच शंकर संतापला. त्याने दक्षासकट त्याच्या यज्ञाचा नाश केला. मग यज्ञकुंडातील सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन तो त्रैलोक्यात संचार करू लागला. शंकराचा हा उन्मत्तावस्थेतील संचार थांबावा म्हणून विष्णूने सुदर्शन चक्र सोडून कलेवराचे तुकडे तुकडे केले.         यातील ५१ तुकडे पृथ्वीवर जेथे जेथे पडले त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ तयार झाले. त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रात शक्तीचा जागर हरप्रकारे केला जातो. अखिल विश्वाला व्यापणा-या शक्तीने विविध रूपांतून असुरी शक्तीचा नाश करत नवनिर्मितीचा संदेश दिला आहे. ही शक्ती  साडेतीन शक्तिपीठांच्या रूपाने जागृत आहे.

महालक्ष्मी मंदिर – कोल्हापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

कधी काळी मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्‍याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

 तुळजाभवानी – श्री क्षेत्र तुळजापूर

भारतातील शक्तिदेवताच्या पीठापैकी साडे तीन पीठे महाराष्ट्रात आहे. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितली गेली आहे. त्या माहितीनुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे.

स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज, भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंती आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

 रेणुकादेवी – माहूर

माहूर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुकादेवी आहे. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत.येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली. ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही. तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही, हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली. नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ‘इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर’ असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली. तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली. ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल. फक्त तू मागे पाहू नकोस. ‘परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते. तेवढेच परशुरामाला दिसले. या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले..!!

सप्तशृंगीदेवीनाशिक

महाराष्ट्रात देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी, तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते.

आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे. मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली अन्‌ होमाद्वारे ती प्रकटही झाली. तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. याव्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही. या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती चे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आख्यायिका आहे.

देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते. एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे. येथील निसर्गाचे रूप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरअर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती.

अशी ही महाराष्ट्रातील देवींची साडे तीन शक्तिपीठे खूपच जागृत देवस्थाने मानली जातात. येथे जाऊन देवीचे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात आणि आपल्या मनातील भावना देवीसमोर मांडतात.

आंतरजालावरुन साभार

या लेखाचा व्हिडियो करिता इथे क्लिक करा

पर्यावरणस्नेही सजावट

लहानपणापासून जे पाहात आलोय त्यानुसार सजावटीच्या पारंपरिक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात..

Beautiful Tree Making For Ganpati Decoration 2018 | ganpati ...

आमच्या गणपतीला यायचं हं!’ असं आग्रहाने कुणीतरी बोलवावं आणि आमचा गणपती केवळ दीड दिवसांचाच आहे असं सांगावं, म्हणजे पाहुण्याच्या मनाला एस्सेलवर्डच्या मोठय़ा राईडमधून झपकन खाली कोसळायला होते. शहरं वाढायला लागली तशी राहती घरं वेशीबाहेर फेकली गेली. त्यात सणाच्या दिवसात जागेची, माणसांची अडचण, कामाची व्यस्तता तर असतेच, पण ‘पाहुण्यांची ऊठबस’ करण्याची जबाबदारी केवळ महिला वर्गावरच लादलेली असल्याने घरगुती १० दिवसांचे गणपती ७, ५ ते दीड अशा दिवसांवर आले.

गणपती येतो येतो आणि जातो जातो. परंतु यातही आपला उत्साह कमी होत नाही. घरात बच्चेकंपनी उत्साहात असते. दीड दिवसांसाठी खूप सारा डेकोरेशनचा पसारा करता येत नाही. पर्यावरणप्रेमी बच्चे व त्यांचे पालक थर्माकोल वापरत नसल्याने सजावट करताना आणखीनच ताण येतो. छोटय़ा कुटुंबामध्ये मदतीलाही फार कुणी जवळ नसतं. म्हणूनच तुमच्यासाठी नव्या धाटणीच्या घरांना शोभेल अशा सजावटीच्या कल्पना देत आहोत.

लहानपणापासून जे पाहात आलोय त्यानुसार सजावटीच्या पारंपरिक कल्पना प्रत्येकाच्या मनात असतात. त्या जरा बाजूला ठेवून घरातील बच्चेकंपनीची व गुगल व यूटय़ूबची मदत घ्यावी लागेल. (साधारण मागची भिंत उजळ रंगाची व २ बाय ४ च्या टेबलाला गृहीत धरून कल्पना देत आहे.)

Go Green Eco-Friendly Ganpati Decoration
  • याच ग्रासबेडमागे फेंगशुईच्या बांबूची रांग करू शकता. यात गणपती विसर्जनानंतर ही रोपं तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा सोसायटीत ठेवू शकता. अथवा पाहुण्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. अशी रिसायकल व सोपी मखर सजावट होऊ  शकते.
Ganpati decoration ideas at home with flowers & Plants | by Blooms ...
  • हल्ली प्लास्टिकची ग्रासबेड मिळतात, तशा वेलीही मिळतात. त्या वेलीची चादर गणपती मागे एका रेडीमेड जाळीवर उभी डकवू शकता. (खऱ्या रोपांपेक्षा हे थोडं खर्चीक होईल.) पण याचा पुनर्वापर कित्येक वर्षे करता येऊ शकतो.
  • गणपतीच्या मागे उजळ रंगाची प्लेन भिंत असेल तर बाजारात मिळणारी विविध रंगी फुलपाखरे त्यावर चिटकवून भिंतीला आकर्षक बनवू शकता. किंवा पारदर्शक कागद/प्लास्टिकवर मूळ आकार असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रिंट घेऊन त्या कात्रीने नीट कापावे व टू-वे टेपने भिंतीवर चिटकवल्यास हे खरे भासतील.
Ganesh Chaturthi 2016: Simple yet insanely beautiful decoration ...
  • ओरिगामीची आवड असेल तर तुमच्यासमोर खूप स्वस्त व सोपे पर्याय आहेत. उजळ, रंगीत, टेक्सचर असणारे कागद बाजारात सहज मिळतात. युटय़ुबवर जाऊन ओरिगामी म्हणून सर्च केल्यास गोलाकार पंखे, फुलपाखरे, पक्षी, फुले, बनवता येतील. त्याचा वापर करून गणपतीची मागची भिंत सजवता येईल.
10 Simple Yet Beautiful Ganpati Decoration Ideas For Home
  • याच पाश्र्वभूमीवर गणपतीचे वाहन असणारे ओरिगामीचे उंदीर उभे राहतात. त्यांच्या मोठय़ा ते छोटय़ा आकाराच्या विविध रंगी आवृत्त्या तयार करा व चौरंगाच्या दोन्ही बाजूने चिटकवा.
  • आकर्षक सजावट म्हणजे विविध रंग वापरायलाच पाहिजे असा हट्ट नको. एकाच रंगात, एकाच रंगाच्या विविध रंगछटा (शेड्स) वापरल्यास सजावटीला एक कलात्मकता येते. त्यासाठी तयार गोलाकार सफेद आकाश कंदील घेऊ शकता. त्यावर छोटी खोटी फुले किंवा वेली टाकून टेबलाच्या मागून व वरून सोडू शकता.
  • युटय़ुबवर विविध आकाराची फुले बनविण्याची पद्धती आहेत. त्यात तुम्ही पांढऱ्या रंगाची विविध जाडीच्या कागदावर फुले बनवून घ्या. ही फुले अगदी शाळेतील मुलेही झटपट करू शकतील. शेजारच्या मुलांची हक्काने मदत घेऊन अशा फुलांना ‘ग्लुगन’ने किंवा व्हाइट गमने प्लेन कागदावर चिटकवावी. त्यापुढे असणारा रंगीत बाप्पा शोभून दिसतो.
Ecofriendly Ganpati Decoration ideas at home | very easy Paper ...
  • विविध प्रकारच्या माध्यमात काम करण्याची आवड असल्यास गुगलवरून मोठय़ा आकाराची वॉलपेपर इमेज सर्च करावी. त्यात तुम्ही गणपतीची विविध नावे, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र असे देखील शोधू शकता. त्या इमेजला सनबोर्डवर (व्हिनाइल) प्रिंट करून घ्या आणि असे २-३ सनबोर्ड एकमेकांना चिटकवून अर्धषटकोनात उभे करा. ही पाश्र्वभूमीदेखील अनोखी भासते.
Eco-Friendly Ganesh: Eco friendly Decorations Ideas
  • सध्या आधुनिक घरात प्रोजेक्टर किंवा मोठे स्क्रीन असणारे स्मार्ट टीव्ही असतात. त्यात झरा, नदी समुद्राचा व्हिडीओ घेऊन ती रिपीट मोडवर ठेवा. आणि व्हिडीओसोबत समुद्र, झऱ्याचा आवाज युटय़ुबवरच मिळेल. त्यामुळेही आपला गणपती आणि आपण खरोखरच समुद्राच्या किनारी आहोत असा भास देतील.

अशा रीतीने पटकन होणारे व जास्त खर्चीक नसणारे घरगुती असे मखर करण्यात तुम्हाला वेगळा आनंद नक्की मिळेल.

सजावटीत महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे लाइटस्- प्रकाशयोजना. पण उत्साहाच्या भरात गणपतीच्या मुखावरच मोठा झोत सोडलेला असतो. त्यामुळे वातावरण आल्हाददायक न राहता तप्त झाल्याचा भास होतो, हे टाळावे.

खूप झकपक व दिव्यांच्या माळा लावून डान्सफ्लोअरचे वातावरण तयार होते. काचेच्या ग्लासात/ वाडग्यामध्ये या चमचम माळा सॉफ्ट मोडवर सोडाव्यात व त्यात तांदूळ भरून घ्यावे. खूपच चांगला परिणाम साधला जातो.

वाचनाचा कंटाळा येतो मग हे वाचा

पुस्तके वाचण्याचे अनेक फायदे आहेत, पण एकाच वाक्यात सांगायचे झाल्यास, एक प्रसिद्ध वाक्य या साठी पुरेसे आहे. ते म्हणजे,

वाचाल तर वाचाल”

या वाक्यातून वाचनाचे महत्व सांगताना म्हणतात, जसे जगण्यासाठी मुलभूत गरजा महत्वाच्या आहेत, ज्यांशिवाय जगणे अवघड आहे. वाचन त्या गरजांपैकी एक आहे.

वाचनाचे फायदे:-

  • जीवनाचा खरा अर्थ व खरा आनंद प्राप्त होण्यासाठी वाचन करावे. वाचनामुळे आपण सखोल विचार करू शकतो. चिंतन करू शकतो.
  • मनन करू शकतो व आपल्यात असलेला अहंभाव, अहंपणा व ‘मी’ पणा हळूहळू नष्ट होऊ लागतो. आपण सभ्य बनतो. आपल्यातले दैवी गुण विकसित होतात.
  • निरोगी दीर्घायुष्य कसे जगावे? रोगांपासून बचाव कसा करावा? वाईट संधी व व्यसने कशी टाळावीत? याबद्दलच्या वाचनाने तुम्ही सुखी व्हाल.
  • वाचनाच्या छंदाने वाचनाची भूक वाढत जाते व यातूनच चांगली चांगली पुस्तके जमा करण्याचा छंद लागतो. यातूनच स्वतःच्या पुस्तकांचा खजिना तयार होतो. ज्याची किंमत पैशात करता येत नाही. असा खजिना आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो.
  • वाचनाने ज्ञान सतत भर पडते. अफाट वाचनानेच खऱ्या अर्थाने शिकता येते.
  • वाचनामुळे लेखन समृद्ध होते. लेखनशैली गुणवत्तापूर्ण होते. वक्तृत्व कला सहज साध्य होऊन समृद्ध होते.
  • मन स्वच्छ, निरोगी, आनंदी, शक्तिमान होण्यासाठी त्या मनाला वाचनाने न्हाऊ घालावे.
  • वाचनाने आकलन शक्ती वाढते व प्रत्येक गोष्ट स्वच्छ व मूलभूत पाहता येते. वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो. माणसातील अशुद्धता व भेसळ निघून जाऊन चांगले विशुद्ध जीवन जगण्याची संधी मिळते.
  • बुढी व मन यांचा ताळमेळ घालून आपल्यात मानवता निर्माण होण्यासाठी आपण मानवी होण्यासाठी व आपणा सर्वांना वाचनाची जरूरी आहे.
  • ‘ज्यांना कोणी नाही, ज्यांची दुःखे अनंत आहेत, अशांचे अश्रू पुसण्यासाठी माणसाचे मन तयार होईल व सर्व मानव हे एकच आहेत. दुसऱ्यात व माझ्यात फरक नाही. त्या सर्वांचे माझे संबंध आहे. जो कुणी तरी माझा आहे. त्याच्याबद्दल मला काहीतरी केले पाहिजे.’ ही भावना मनात निर्माण होईल व ही मानवतेची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे.
  • प्रख्यात लेखक, तसेच थोर विचारवंत यांचे लेखन त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर व चिंतनावर आधारलेले असते. त्या त्या लेखकांची किंवा विचारवंतांची पुस्तके वाचणे म्हणजे त्यांच्या अनुभवात आपण भागीदार होणेच होय.
  • वाचनाने आपण अज्ञात अशा प्रदेशात स्वच्छंदतेने फिरू शकतो व ज्या गोष्टी अजूनपर्यंत आपल्याला माहीत नव्हत्या त्या ज्ञात होत जातात.
  • वाचनाने माणसाचे मन ताजेतवाने होते. मेंदूच्या पेशी अधिक चांगल्या तऱ्हेने व जोमाने काम करू लागतात. – सर्व प्रकारचे ज्ञान व माहिती मिळविण्यासाठी वाचन हे आपली भूक वाढवते.
  • अज्ञानाचा अंध:कार, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करण्यासाठी, जीवन क्रांतीमान व सुगंधी करण्यासाठी वाचनाची कास धरावी. विचारांच्या तर्कसंगतीला, वर्तणुकीला उत्कृष्ट असे पैलू पाडले जातात.
  • विचारशक्तीला चालना मिळते व उत्कट, उदात्त व भव्य विचार परिलुप्त मन तयार होऊन उपयोगी व उपकारक असे काहीतरी घडू शकते. – आपली प्रत्येक कृती निर्दोष होण्यासाठी आपल्यातील कला, कसब वाढवण्यासाठी व आपली इच्छाशक्ती प्रखर होण्यासाठी वाचन जरूर आहे.

बाकी, पुस्तक वाचनाचे अनेक फायदे आहेत. पुस्तके कोणती वाचावीत हे महत्वाचे नाही, वाचणे हे महत्वाचे आहे.

पण कित्येकजणांकडे रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार? तर काही लोकांना पुस्तक वाचायच म्हटलं कि त्याचा कंटाळा येतोच. मग ती कितीही सोपी, मजेशीर व महत्वाची का असेना. कंटाळा येणे साहजिक आहे पण जेव्हा ते पुस्तक वाचणे हे आपल्या ज्ञानार्जना साठी असते ,एखाद्या परीक्षेसाठी असते तेव्हा कंटाळा करून कसे चालेल ते म्हणतात ना “आळस हा माणसाचा शत्रू आहे“.

पुस्तक वाचताना कंटाळा येऊ नये अस नेहमी वाटत खरं पण तरीही थोड्या वेळाने कंटाळा यायचाच. एवढंच काय तर कित्येक वेळेस तर चक्क झोप येते पण जर कोणी ही पुस्तके आपल्याला मनोरंजक, श्रवनीय पद्धतीने ऐकवली तर

नव्या युगाने / तंत्रज्ञानाने ह्या प्रश्नाचे उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच “बोलती पुस्तकं”!

आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!)

ही बोलकी पुस्तके कशी मिळवायचेय ते जाणून घेऊया त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करून त्या साईट जावे लागेल.

बोलकी पुस्तके

अजून जाणून घ्यायचे असेल तर केला व्हिडियो पाहूया अधिक माहिती करिता.

DISCLAIMER: VicharDan is not financial/investment advisors, brokers, or dealers. They are solely sharing their personal opinions; therefore, all strategies, tips, suggestions, and recommendations shared are solely for entertainment purposes. There are financial risks associated with investing and VicharDan’s results are not typical; therefore, do not act or refrain from acting based on any information conveyed in this video, webpage, and/or external hyperlinks. For investment advice please seek the counsel of a financial/investment advisor(s); and conduct your own due diligence.

२६ जुलै – कारगिल विजय दिवस

२६ जुलै १९९९ ला भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकलं. तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.  मे १९९९ मध्ये सुरू झालेलं हे युद्ध १९९९ पर्यंत चालंल ज्यामध्ये आपले ५२७ जवान शहीद झाले तर १३०० जवान जखमी झाले. पाकिस्तानकडुन या युद्धाला सुरूवात करत ५ हजार सैनिकांना घेऊन कारगिलच्या पर्वतात घुसखोरी केली गेली. त्यानंतर ‘ऑपरेशन विजय’ला सुरूवात झाली. या युद्धात भारतीय एअरफोर्सने आपली ताकद दाखवत पाकिस्तानने ज्या जागेवर कब्जा केला तिथे बॉम्बहल्ले केले. 

वायुसेनेची ताकद 

कारगिल युद्धात एकूण २ लाख गोळे डागण्यात आले. ३०० हून अधिक मोर्टार, तोफ, रॉकेटचा वापर करण्यात आला. पाकिस्तानला मागे हटविण्यासाठी भारतीय वायुसेनाने मिग २७ आणि मिग २९ चा वापर केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या भागांवरही बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानच्या अनेक भागात आर-७७ मिसाइलने हल्ला केला गेला. 

कशी मिळाली घुसखोरांची माहिती ?

३ मे १९९९ ला एक गुराख्याने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोर घुसल्याची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यास गेली तेव्हा घुसखोरांनी त्यांना पकडले आणि ५ सैनिकांची हत्या केली. इथूनच कारगिल युद्धाला सुरूवात झाली. जुनच्या सुरूवातीलाच भारतीय सेनेने अनेक चौक्या परत घेण्यास सुरूवात केली. १४ जुलैला तात्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय जिंकल्याची घोषणा केली आणि २६ जुलैला विजय दिवस साजरा करण्याची घोषणा केली. 

आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतानं कारगिलमध्ये पाकवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. जेव्हा भारतीयांनी पाकड्यांना पळवून लावलं तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

आपण शांततेत झोपू शकलो आहोत कारण कोणी तरी जाग राहून या देशाचे संरक्षण करीत आहे. होय देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य दिवस रात्र जागे राहून सीमेवर संरक्षण करत असतात. उष्णता आणि थंडीची चिंता न करता ते रात्रंदिवस सीमेवर उभे असतात. भारतीय सैन्य हे देशप्रेमाचे खरे उदाहरण आहे जे त्यांच्या जीवनाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात. भारतीय लष्कराचा पराक्रम पाहून शत्रूही भीतीने थरथर कापतो.

आपल्या देशाबद्दलच्या शत्रूच्या वाईट हेतूंचा नाश करतात आणि आवश्यकतेनुसार देशाला वाचवण्यासाठी हसतहसत गरम वाळवंटातून 0 डिग्री पारावर हळूवारपणे उभे राहणाऱ्या बलिदानापासून मागे न हटणाऱ्या सैन्यास सलाम.

प्रत्येक भारतीयांना अश्या शूर भारतीय सैन्याचा अभिमान वाटला पाहिजे. भारतीय सैन्याचे अभिमानाने म्हटलेले अनमोल विचार जाणून घेऊ या,

१ – आतंकवादियों का माफ़ करना या न करना ये ईश्वर का काम है, लेकिन उन्हें ईश्वर से मिलाना हमारा काम है।भारतीय सेना

२ – मैं तिरंगा फहराकर वापस आऊंगा या फिर तिरंगे में लिपटकर आऊंगा, लेकिन मैं वापस अवश्य आऊंगा।कैप्टन विक्रम बत्रा, परम वीर चक्र

३ – सात बार गिरकर, आठवी बार उठ जाना ये काम भारतीय सेना का जवान ही कर सकता है।

४ – न कोई पत्थर  न लोहा है, न शोला है, सभी का सम्मिलित प्रारूप ,भारत का सिपाही है।

५ – आसान नहीं फौजी कहलाना दोस्त, जज़्बात पिघलाकर रगों के लोहा भरना पड़ता है।

६ – जब भी तुम हमारे घर में घुसने की कोशिश करोगे, हम तुम्हें तुम्हारे घर में घुसकर मारेंगे।

७ – दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त, मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी।

८ – यदि कोई कहे कि उसे मौत से डर नहीं लगता, या तो वो झूंठ बोल रहा है या वो कोई भारतीय सिपाही है।

९ – हम पूरे दमखम से सिर्फ जीतने के लिए लड़ते है क्योंकि जंग में कोई भी दूसरे स्थान पर नही आता है।

१० – हमारा तिरंगा इसलिए नहीं फहराता है  कि हवा चल रही  है, ये हर उस जवान की आखिरी सांस से फहराता है।

११ – सलाम हैं इस देश की सेना को जो देशवासियों की खातिर सीमाओं पर कष्ट उठाते हैं, अपनी नींद खो कर, हमें बेखौफ सुलाते हैं।

१२ – न बर्षा में गले, न सर्दी में कांपे, न गर्मी से तपें हम फौजी इस देश की शान है।भारतीय सेना

१३ – भगवान हमारे दुश्मनों पर दया करे क्योंकि हम तो करेंगे नहीं।

१४ – शेरों के पुत्र शेर ही जाने जाते हैं ! लाखों के बीच फौजी पहचाने जाते हैं।

१५ – जब देश में थी दिवाली…. वो खेल रहे थे होली…जब हम बैठे थे घरो में… वो झेल रहे थे गोली…क्या लोग थे वो अभिमानी…है धन्य उनकी जवानी……जो शहीद हुए है उनकी… ज़रा याद करो कुर्बानी…ए मेरे वतन के लोगो… तुम आँख में भर लो पानी..

१६ – यदि कोई आतंकवादी जन्नत जाना चाहता है हम भारतीय सेना उसे जन्नत पहुचाने के लिए 24 घंटे खड़े है।

१७ – इस बात का हमें अफ़सोस है की अपने देश को देने के लिए हमारे पास केवल एक ही जीवन है।

१८ – एक फौजी कितना भी बूढ़ा हो जाये कहलाता जवान ही है।

१९ – हम कभी पीछे नहीं हटते या तो मारते हैं या मरते हैं।

२० – एक भारतीय सैनिक इसलिए नहीं लड़ता कि वो सामने वालों से नफरत करता है बल्कि इसलिए लड़ता है क्योंकि वो अपने पीछे वालों से प्यार करता है।भारतीय सेना

२१ – कोमल और मानवीय रहना यह मेरा स्वाभाव है , पर याद रहे जब देश के रक्षा का सवाल हो , मैं सबसे घातक और शक्तिशाली हूँ।

२२ – देश की महक अब  मेरे कपड़ों से आने लगी है ….. अब तो मेरी धड़कन भी जय हिन्द गाने लगी है।

२३ – जिक्र अगर असली हीरो का होता है, तो जुवां पर नाम इस देश के वीरों का होता है।

२४ – गुज़ारिश है इन हवाओं से आज ज़रा तेज बहें, बात मेरे देश की शान ‘तिरेंगे’ के लहराने की है।

भारतीय सैन्याच्या अभिमानास्तव सांगितलेल्या मौल्यवान विचारांनी तुम्हाला किती प्रेरणा दिली, हे आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा. कोणतेही प्रश्न व सूचना स्वागतार्ह आहेत. संपर्कात रहाण्यासाठी सामायिक करा, सदस्यता घ्या. 
धन्यवाद

आंतरजालावरून साभार